Eknath Shinde : आरशात बघून वारसा सांगता येत नाही

निवडणूक निकालानंतरही शहाणपण आले नसल्याची एकनाथ शिंदे यांनी टीका
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

‘सुपाऱ्या देऊन बदनामीच्या कितीही मोहिमा चालवल्या तरी काही फरक पडणार नाही. काही पाखंडी लोकांना पुढे करून शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत हे दुर्दैव आहे. गद्दार म्हणून भुई थोपटत बसा एक दिवस पक्षाचे दार बंद करावे लागेल,’असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर चढवला. मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निवडणूक निकालामुळे शहाणपण आलेले नसल्याचे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना चपराक लगावली.

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना शिंदे यांनी शेरोशायरीचा आधार घेतला. त्यांनी कुणाल कामराच्या विडंबन गीताचा उल्लेख केला नसला तरी यामागे ठाकरे यांची शिवसेना असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने सुपाऱ्या देऊन बदनामी केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

‘सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजणाऱ्यांना सगळेजण सोडून गेले. कचऱ्यातून जी वीज निर्माण झाली, त्यातून बसलेल्या ‘हायव्होल्टेज’ शॉकमधून अद्याप ते सावरले नाहीत,’ अशी खरमरीत टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत केली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट यापूर्वी शिंदे यांनी केला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले की, मिस्टर बिनने ‘डस्टबिन’चा उल्लेख केला. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या ‘डस्टबिन’मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ‘डस्टबिन’मध्ये कोण बसल होते कोणी बघितले नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कोणाला घाम फुटला होता हे पाहिले.

परिवहन विभागातील एक सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे याच्या विरोधात चौकशी सुरू राहील. तसेच आर्थिक गुन्हे असल्याने ‘ईओडब्ल्यू’मार्फत चौकशी केली जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले.

...तेव्हा राज्यघटना का आठवली नाही

हनुमान चालिसा म्हणल्याने राणा दांपत्याला आत टाकले,खोटे खटले उभे करून देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला तेव्हा तुम्हाला घटना का आठवली नाही, असा सवाल शिंदे यांनी ठाकरे यांना उद्देशून केला.

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची सरकार शंभर टक्के पूर्तता करणार, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.

- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com