

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त दरे गावात आले आहेत. दरे गावातील त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात असून, आज जागतिक बांबू लागवड दिवसानिमित्त त्यांनी बांबूची लागवड केली. यावेळी त्यांनी शेती, दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं.