
Shiv Sena Latest News: शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सातत्याने दिल्ली दौऱ्यावर असतात. तिथे ते अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी घेतात आणि चर्चा करतात. आता तर एकाच आठवड्यात दोनवेळा आणि एका महिन्यात तब्बल तीनवेळा त्यांनी दिल्लीवारी केली आहे. बुधवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. शिंदेंच्या नेहमीच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये काही शिजतंय का? असा प्रश्न उपस्थित होतो.