
Latest Mumbai News: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत नव्या सरकारमधील जागावाटपाचे सूत्र दिल्लीतील भाजपचे श्रेष्ठी ठरवतील, असा निरोप दिल्याचे समजते.
भाजपने विधिमंडळ नेता निवडल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.