
Maharashtra CM: महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. कारण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आपला दावा सोडला. तसंच भाजपच्या मुख्यमंत्र्यासाठी आपलं समर्थन असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.