Sun, March 26, 2023

Eknath Shinde: निवडणुक आयोगाच्या निकालावर CM शिंदेंची यांची पहिली प्रतिक्रिया
Published on : 17 February 2023, 1:41 pm
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. हा सत्याचा विजय झाला आहे.
खरी शिवसेना कोणती आहे हे आता कळले आहे. जो संघर्ष केला त्याचे चीज झाले आहे. आमचा संघर्ष काही वाया गेलेला नाही.