शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर!

शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSakal
Updated on

मुंबई : मुख्यंमत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांबाबत मोठा मानस व्यक्त केला होता. राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी केला होता. आता आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Eknath Shinde govt has taken imp steps to prevent farmers suicide in Maharashtra)

CM Eknath Shinde
मविआला झटका! शिंदे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातील वर्ल्ड बँकेचा जो स्मार्ट प्रकल्प आहे. हा प्रकल्प युद्धपातळीवर पुढं सुरु ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प कोविडमुळं मागे पडले होते ते तातडीनं सुरु करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा झाली तसेच ते कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यासाठीचा प्रकल्प फास्टट्रॅकवर करणार

तसेच वैतरणा, उल्हास नदीचं जे पाणी समुद्रात वाहून जातं ते २१६ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये प्रवाही वळण योजना आणि उपसा योजना या दोन माध्यमातून हे पाणी गोदावरीत वळवणार. हा प्रकल्प फास्टट्रॅकवर हाती घेण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाला जर हे पाणी मिळालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा दावा करत हा सरकारचा मोठा निर्णय ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विदर्भातील दुष्काळी भागाला फायदा होणार

त्याचबरोबर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पातील सुमारे ६४ टीएमसी पाणी हे नळगंगा नदीत नदीजोड प्रकल्पाद्वारे सोडण्यात येणार. यामुळं नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या दुष्काळग्रस्त भागाला या पाण्याचा फायदा होईल. त्यामुळं सुमारे ३ लाख ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. त्यामुळं दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना याचा फायदा होईल तसेच शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल, यामुळं देखील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

अॅग्री बिझनेसला तीन हजार कोटी वर्ल्ड बँकेकडून मिळणार

वर्ल्ड बँकेच्या रुरल ट्रान्सफॉर्मेशन अॅग्री बिझनेस या योजनेला वर्ल्ड बँकेकडून सुमारे तीन हजार कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर सकाळी केंद्राचे अर्थमंत्री, रेल्वे मंत्री आणि उद्योग मंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली. या बैठकीत देखील मुंबई, दिल्ली, बंगळुरु कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली. तसेच टेक्टाईल पार्क, बल्क ट्रक पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क आणि इतर महत्वाचे निर्णय सकाळच्या बैठकीत झाले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com