मविआला झटका! शिंदे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

औरंगाबादमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Chief Minister Eknath Shinde will take charge today
Chief Minister Eknath Shinde will take charge today esakal
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यातील काही बदल्यांना नव्या शिंदे सरकारकडून स्थिगिती देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादमधील बदल्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Transfers of officers regarding Aurangabad canceled by Maharashtra Shinde govt)

Chief Minister Eknath Shinde will take charge today
एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा पश्चाताप - विनायक राऊत

महाविकास आघाडीकडून सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर औरंगाबाद पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबादला सिडकोत दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे सरकारानं रद्द केल्या आहेत. औरंगाबाद शहरासाठी ही महत्वाची घडामोड ठरली आहे.

Chief Minister Eknath Shinde will take charge today
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

यापूर्वी जे जीआर काढले गेले किंवा बदल्या झाल्या होत्या त्या जुन्या महाविकास आघाडी सरकारला अनुकूल अशा होत्या. नवं सरकार आल्यानंतर ते स्वतःला अनुकूल अशा आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर भर देणार आहे. या गोष्टी सरकारमध्ये नेहमीच होत असतात.

Chief Minister Eknath Shinde will take charge today
LACचा प्रश्न सुटणार का? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिली माहिती

शिवसैनिकांच्या बंडात ठाण्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातून झाले आहेत. त्यामुळं आता या शहराशी निगडीत असलेले आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बदली स्थगित करण्यात आली आहे. या प्रकारामुळं आता यापूर्वी ज्या बदल्या झाल्या आहेत. त्या बदल्यांच्या नियुक्तींबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com