Eknath Shinde| ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde group likely to organize Hindu Garv Garjana Yatra

Eknath Shinde ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार

मुंबईसह राज्यात होणारी आगामी महानगरपालिका निवडणुक तसेच पुन्हा पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Eknath Shinde group likely to organize Hindu Garv Garjana Yatra )

शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळी झालेल्या शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यात पाऊले उचलली आहेत. त्यानुसार आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, थोड्याच दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

तत्पूर्वी, शिंदे गटाकडून मोठी रणनिती आखली जात आहे. ठाकरेंच्या राज्य दौऱ्यापूर्वी हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी हिंदू गर्व गर्जना यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ही यात्रा २० सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या या यात्रेत त्यांच्या समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिंदे समर्थक आमदारांवर जिल्ह्यातील एका मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुन एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जाणार आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही पक्ष संघटना वाढविण्याकडे ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील तीस जिल्ह्यांत जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ३० जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि मोठे नेते यूपीचा दौरा करणार आहेत. केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर आगामी महापालिका निवडणुकाही शिवसेना ताकदीने लढणार आहे, असे अनिल सिंह यांनी स्पष्ट केले.