'पांडुरंगाच्या महापुजेला एकनाथ' सोशल मीडियावर रंगली चर्चा

Eknath Shinde new CM  pandharpur Wari
Eknath Shinde new CM pandharpur Wari esakal

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापुजा केली जाते. यंदाच्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर पांडुरंगाच्या महापुजेला एकनाथ शिंदे जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Eknath Shinde new CM pandharpur Wari Maharashtra Politics)

Eknath Shinde new CM  pandharpur Wari
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील सत्तानाट्य पाहता आषाढी वारी (Ashadhi Wari) सुरू असून पंढऱपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. एकनाथ शिंदें बंड पुकारल्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होती आणि विठ्ठलाची पूजा करतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी आहे.

Eknath Shinde new CM  pandharpur Wari
एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री; फडणवीसांचा मास्ट्ररस्ट्रोक

आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेची प्रथा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची महापूजा करण्याचा पहिला मान तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना प्राप्त झाला होता. त्यांच्यासह राज्यातील 16 मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली आहे. ही पूजा करणारे उद्धव ठाकरे सतरावे मुख्यमंत्री, ठरले तर एकनाथ शिंदे आठरावे मुख्यमंत्री आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तत्कालीन महसूल मंत्री राजारामबापू पाटील पूजेसाठी पंढरपुरात आले होते, त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून 20 हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.

Eknath Shinde new CM  pandharpur Wari
एकनाथ शिंदेच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण

1970 मध्ये समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी, निधर्मी राज्यात सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही, म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून 1971 साली शासकीय पूजा झाली नाही. 1972 मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. लोक आपली शेतीवाडी, गुरेढोरे सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले.

वारकरी म्हणू लागले, सरकारने पूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घातले. त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा 1973 पासून पुन्हा चालू केली, ती आजतागायत चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com