'मुंबईकर सुज्ञ आहेत ते नेहमी आमच्या पाठीशी' एकनाथ शिंदेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rane

समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली

'मुंबईकर सुज्ञ आहेत ते नेहमी आमच्या पाठीशी'

मुंबई: बाळासाहेब हे शिवसैनिकांचे दैवत आहे, त्यांच्या विचाराने मुख्यमंत्री राज्याचा कारभार चालवत आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तमपणे काम करत आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, मात्र कोविडची स्थिती लक्षात घेता नियम पाळले पाहिजेत, असा टोला मंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या जनआशिर्वाद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लगावला. मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाचा जनआशिर्वाद मोर्चा सुरू असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाली होती.

मंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईकर सुज्ञ आहेत, मुंबईवर जेंव्हा-जेंव्हा संकट आलं, तेव्हा संकटकाळी कोण धावून येतं हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचीही चिंता नाही, असा टोला नारायण राणेंच्या 'मुंबई जिंकायची आहे' यावर लगावला आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना किती अपघात झाले याची माहिती घेऊन, ज्यांचा जीव गेला त्यांना मदत करू असं आश्वासनही मंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

Web Title: Eknath Shinde On Narayan Rane Mumbai Jan Ashirvad Morcha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narayan RaneEknath Shinde