Uddhav Thackeray : ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलाला 'मुन्नाभाई' कोण? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला 'मुन्नाभाई' कोण? वाचा सविस्तर

मुंबई - शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्री होतील असा अंदाज बांधला जात होता. त्याचं कारण म्हणजे भाजपचे आमदार १०० हून अधिक होते. मात्र ऐनवेळी मागच्या रांगेत असलेल्या शिंदेंना भाजपने समोर करत मुख्यमंत्री बनवले. हा सर्वांसाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. मात्र आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजप आणि मनसेवर हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Uddhav Thackeray : शिवसैनिकांना 'संजीवनी' देणारे उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाच मुद्दे

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कडाडून हल्लाबोल करताना मुंबईवर गिधाडे घिरट्या घालत आहेत. हे काय नवीन नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून मोठे झालो आहोत. स्वराज्यावर ज्यांनी चाल केली त्यांना धडा शिकवला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री मुंबईत आले. आणि म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, शिवसेना तलवारीचं पातं आहे. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान येत आहेत. यावेळेला लढाई कशी होणार हे तुम्ही लक्षात घ्या. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. गृहमंत्री तर आहेतच, आपले गद्दार आहेतच, मुन्नाभाई आहेत. आणखीन कोणी आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: Uddhav Thackeray: तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली? उद्धव यांचा मोदींना सवाल

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हटलं होतं. आज पुन्हा एकदा उध्दव यांनी भाषणात मुन्नाभाई असा उल्लेख केला. अर्थात त्यांचा रोख पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याकडे होता का हे स्पष्ट झालं नाही. मात्र उद्धव ठाकरेंच्या टीकेची चर्चा होतेय.

दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या मुन्नाभाई टीकेला प्रत्युत्तर देत होते. त्याचवेळी उपस्थितांनी मुन्नाईभाई तुम्हाला म्हटलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शिंदे यांनी मुन्नाभाई मुद्दावर बोलण्याचं टाळलं.

Web Title: Who Is Munnabhai Which Mention In Uddhav Thackerays Speech Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..