दाऊदशी संबंध असणाऱ्याचं शिवसेना समर्थन कशी करतेय; शिंदेंचा राऊतांना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde latest political News

दाऊदशी संबंध असणाऱ्याचं शिवसेना समर्थन कशी करतेय; शिंदेंचा राऊतांना सवाल

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या निलंंबंनासाठी प्रयत्न केले जात आहेत, या दरम्यान सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, यादरम्यान एकनाथ शिंदेंचा गट - शिवसेना यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. संजय राऊतांनी बंडखोर आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे, त्यांनी निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा थेट सवाल विचारला आहे. (eknath shinde sanjay raut over dawood connection ncp maharashtra political crisis)

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या सहभागावार गंभीर प्रश्न केले आहेत. मनी लॉंड्रींगशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा संदर्भात दाऊदशी संबंध असलेल्यांना शिवसेना समर्थन कशी करू शकते असे म्हटले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, "मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.."

हेही वाचा: "शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर"; शिंदेंच राऊतांना प्रत्युत्तर

आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज ४० आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटी येथून परत येतील असे म्हटले होते, नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत ते गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार, हे मजा करतायत ते दिसतंय, खात पित आहेत, उड्या मारत आहेत. ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची जीवंत प्रेत मुंबईत येतील, मग त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावे लागेल, मी एवढंच बोललो यात चुकीचं काय आहे, असे राऊत म्हणाले होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी दुसरे एक ट्वीट केले आहे ज्यामध्ये त्यांनी राऊतांना उत्तर देत, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: 'ते जिवंत प्रेतं आहेत, त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल'

Web Title: Eknath Shinde Sanjay Raut Over Dawood Connection Ncp Maharashtra Political Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..