Eknath Shinde: शिंदेंनी फुंकले विधानसभेचे रणशिंग! वर्षावर आमदार, खासदारांसोबत खलबतं

Shiv Sena Meeting: या निवडणुकीत शिवसेना फुटल्याचा परिणाम होत शिंदे यांच्या पक्षाची कामगिरी खराब होईल असा अंदाज राजकीय पंडीत लावत होते.
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv SenaEsakal

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगले यश मिळवले. या निवडणुकीत शिवसेना फुटल्याचा परिणाम होत शिंदे यांच्या पक्षाची कामगिरी खराब होईल असा अंदाज राजकीय पंडीत लावत होते. मात्र, सर्व अडचणींवर मात करत शिंदे यांनी बऱ्यापैकी यश मिळवले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व आमदार आणि नव्याने विजयी झालेल्या खासदारांची बैठक बोलावली आहे.

प्रथम मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत 6 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर 7 वाजता खासदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे बैठक करतील.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालासह आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रात या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 26 जूनपासून सुरू होणार असून त्यापूर्वी शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ शकतो.

Eknath Shinde Shiv Sena
Modi Cabinet: लोकसभेच्या 14 जागा गमावूनही मोदींनी महाराष्ट्रातून केली 6 मंत्र्यांची निवड, काय कारण आहे ?

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या चांगल्या कामगिरीनंतर आता विरोधी महाविकास आघाडीला बळकट करण्याची जबाबदारी आपल्या पक्षाची आहे, असे सांगून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसला आवाहन केले.

भाजपचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीने काम करायचे असल्याचे सांगत, ते म्हणाले, 'आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ असे काही नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

Eknath Shinde Shiv Sena
Raj Thackrey: बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही?, प्रकाश महाजन म्हणाले, 'राज ठाकरे यांना निमंत्रण...'

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकत महायुतीचा सुपडा साफ केला. यामध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले. याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही अवघ्या 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवाला.

दुसरीकडे महायुतीत भाजपने 9, शिंदे यांच्या शिवसेनेने 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केवळ 1 जागी विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com