Shinde Vs BJP : मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या मतदार संघावर भाजपचा डोळा? ; चर्चांना उधाण

Shinde Vs BJP : आमदार रोहित पवार आणि राजू पाटील यांचा भाजपच्या भूमिकेकडे पाहण्याचा सल्ला
Shinde Vs BJP
Shinde Vs BJPsakal
Updated on

Shinde Vs BJP : कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा असून इथे शिंदे गटाचाच उमेदवार असेल असे शिवसेना शिंदे गटाकडून सांगितले जात असले तरी गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघात भाजपची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदार संघ असला तरी भाजपच्या सहकार्याने ही जागा सेनेला जिंकता आली आहे. भाजपला इथे स्वतःचा उमेदवार आणून संघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करावयाचे असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते. यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण व आमदार संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

त्यातच या लोकसभेच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जर तुमची युती आहे तर सेनेच्या मतदारसंघात भाजपला बैठका घेण्याचा कारण काय असे म्हणत शिंदे गटाला इशारा दिला आहे. तर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील येथील वाटचाल भाजप उमेदवाराच्या दिशेने सुरू आहे असं म्हणत रोहित यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे.

या दोन्ही आमदारांच्या वक्तव्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघ हा सध्या शिवसेनेकडे असला तरी पूर्वी भाजपच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. या मतदारसंघात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने वर्षभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन ते चार वेळा मतदारसंघाचा दौरा करून गेले आहेत.

तसेच मंत्री रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात असले तरी चव्हाण यांचे मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार शिंदे यांच्याशी मात्र फारसे पटत नसून त्यांच्यातील वाद यापूर्वी अनेकदा पाहण्यात आले आहेत. मतदारसंघातील भाजपचे इतर आमदार, पदाधिकारी देखील श्रीकांत यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Shinde Vs BJP
Shivsena Shinde Group: महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेला भगदाड; पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा श्रीकांत यांना मदत करण्याऐवजी मंत्री चव्हाणांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे. तशा स्वरूपाच्या अनेक हालचाली लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहेत.

त्यातचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाला एक सल्ला देऊ केला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये जर युती असेल समझोता असेल, तिथे भाजपला बैठका घेण्याचं कारण काय? तिथे चाचपणी करण्याचा कारण काय? सर्व्हे करायचं कारण काय? याच्यावरून समजून जायचं की भाजपला त्यांचंच चिन्ह आणि त्यांचंच पक्ष समजतो. बाकी कुठले नेते आणि लोकांचे प्रश्न कळत नाही.

अनुराग ठाकूर यांना या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, कारण इथे मुख्यमंत्री साहेबांचा मुलगा खासदार आहे, त्यामुळे मोठ्या नेत्यांना इथली जबाबदारी दिली आहे, असही कुठे दबक्या आवाजात कळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब त्यांना कदाचित इथून भाजपची उमेदवारी दिली जाऊ शकते, असे पवार यांनी सांगितले.

Shinde Vs BJP
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासाच्या आत रद्द

तर यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की तसं पाहिलं तर कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. ज्यावेळी भाजपच इथे काही चालत नव्हतं, त्यावेळी स्वर्गीय दिघे साहेबांनी आपल्या हातात खेचून घेतली.

आता कुठेतरी भाजप वरचढ होताना दिसून येत आहे.. मला नाही वाटत की ही संधी सोडतील, कारण भाजपची एक पद्धत राहिली आहे.. रोहित पवार बोलले ते बरोबर बोलले... भाजपाने नेहमी समोरच्या पक्षला छोटा करायला बघतो किंवा दाबायला बघतो, त्यांचं म्हणणं रास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या वाटाघाटी बघाल तर कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपीच्या उमेदवाराच्या दिशेनेच चालू आहे एकंदरीत दिसत आहे, असे पाटील यांनी सांगत रोहित पवार यांच्या वक्तव्यावर समर्थन दिल्याचे दिसून येते आहे...

दरम्यान यावर शिवसेना शिंदे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीं,त्यामुळे कल्याण लोकसभे निवडणूक भाजप लढवते की शिवसेना शिंदे गट हे पहावे लागेल....

Shinde Vs BJP
Manoj Jarange यांच्या उपोषणाचा Eknath Shinde यांना कसा फायदा होणार? जाणून घ्या ५ मुद्द्यांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com