मराठा समाजाच्या आरक्षणावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

मराठा समाजाच्या आरक्षणावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण (Maratha reservation) मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे उदगार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या भूमिपूजन (maratha office inauguration) प्रसंगी काढले. गिरगावातील (Girgaon) प्रार्थना समाज परिसरात ही वास्तू उभारली जाणार आहे. भूमिपूजन प्रसंगी माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील (DY.patil), समन्वयक विरेंद्र पवार (virendra pawar) आदी मान्यवर हजर होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार (shahsikant pawar) हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा: परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 'या' अटीवर २८ दिवसानंतर लसीकरण

आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाचा शिंदे यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने मराठा महासंघाचे लाखोंचे मोठे मोठे मोर्चे निघाले आहेत. शेकडो हात एकत्र येतात तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. या क्षत्रीय मराठा वास्तूमधून मराठ्यांचे चांगलेच झाले पाहिजे. या वास्तूच्या उभारणीसाठी भाई जगताप यांनीही भरपूर मेहनत घेतली आहे. यापुढेही काहीही अडचण आल्यास आपण सज्ज आहोत, अशी हमीही शिंदे यांनी यावेळी दिली.

मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांनी नव्या वास्तूच्या उभारणीचे श्रेय भाई जगताप यांना दिले. मनाची श्रीमंती असलेला मराठा समाज शांतीप्रिय आहे हे कोपर्डी घटनेनंतरच्या समाजाच्या प्रतिक्रियेतून दिसून आले आहे. मात्र सध्या जे राजकारण केले जाते ते थांबले पाहिजे. नवीन नवीन योजनांनी समाजाचे भले कसे होईल याचा विचार या नव्या वास्तूत झाला पाहिजे, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले.

भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आणि मराठा महासंघ यांचे कार्य पक्षविरहित आहे, अशी ग्वाही कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस भाई जगताप यांनी दिली. आर्थिक दुर्बलांना न्याय देण्याची मागणी आम्ही 1986 पासून करत आहोत. या चळवळीतून सामाजिक कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत, असे संयुक्त सरचिटणीस दिलीपदादा जगताप म्हणाले.

loading image
go to top