परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 'या' अटीवर २८ दिवसानंतर लसीकरण

Corona Vaccine
Corona VaccineSakal media

मुंबई : परदेशात (Abroad) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह (students) आता नोकरदार, व्यावसायिकांनीही नियोजीत परदेश प्रवासाचे (Foreign journey evidence) पुरावे दाखवल्यास 28 दिवसांनंतर केव्हाही लस (corona vaccination) घेता येणार आहे. सामान्यता कोविशील्ड लस (covishield vaccine) ही 82 दिवसांच्या अंतराने मिळत आहे.

Corona Vaccine
अकरावी प्रवेश प्रक्रियेत सामाजिक आरक्षणाचा बोजवारा; वाचा सविस्तर

सार्वजनिक लसिकरण केंद्रामार्फत कोविशिल्ड आणि कोवॅक्‍सीन या दोन कोविड प्रतिबंधक लस दिल्या जातात. कोवॅक्‍सीनाला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता न मिळाल्याने परदेशात जाणाऱ्यांना फक्त कोविशिल्ड या लसीचा पर्याय आहे.मात्र,केंद्र सरकारच्या पहिल्या डोस नंतर किमान 82 दिवसांनी या लसीचा दुसरा डोस मिळतो.

त्यामुळे प्रामुख्याने परदेशात जाणाऱ्यांच्या अडचणी होत आहे.महानगर पालिकेने यापुर्वी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 28 दिवसानंतर कोविशिल्ड लस देण्याचे अभियान सुरु केले होते.आता,परदेशात जाणारे नोकरदार,पर्यटक तसेच व्यावसायिकांनाही ही सुविधा उलपब्ध करुन देण्यात आली आहे.यांना 28 दिवसानंतर कधीही कोविशिल्डची लस घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवासाचे पुरावे द्यावे लागणार आहे.असे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हे पुरावे लागणार

- पासपोर्ट

-व्हिसा

-परदेश प्रवासाचे तिकीट

90 लाख नागरिकांना लस

मुंबईत आतापर्यंत 90 लाख 10 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे.यामध्ये 66 लाख 54 हजार नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे.तर,23 लाख 55 हजार नागरीकांचे दोन्ही डोस झाले आहेत.मुंबईत 455 केंद्रावर लस दिली जात आहे.दिवसाला 2 लाख डोस देण्याची क्षमता महानगर पालिकेने उभी केली आहे.मात्र,आवश्‍यक प्रमाणात साठ उपलब्ध नसल्याने दिवसाला 50 ते 60 हजार पर्यंत डोस दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com