Eknath Shinde
sakal
महाराष्ट्र बातम्या
Eknath Shinde: स्वतःचे पायपुसणे करणाऱ्यांना टीकेचा अधिकार नाही : एकनाथ शिंदे
Shinde Slams Uddhav Over ‘Political Hypocrisy’: उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार पलटवार. हिंदुत्व, भ्रष्टाचार आणि राजकीय दुटप्पीपणावर निशाणा. विधानभवन परिसरातील या वक्तव्यात शिंदे यांनी मविआ काळातील भ्रष्टाचार आणि ३७० कलमाच्या मुद्द्यावरही टीका केली.
एकीकडे मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांचेच गोडवे गायचे ही दुटप्पी भूमिका आहे. ज्यांनी स्वतःचे पायपुसणे करून घेतले त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही,’’ अशा शब्दांत विधानभवन परिसरात गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार उलटवार केला.

