महाविकास आघाडीला भलंमोठं भगदाड; CM शिंदेंनी साधली परफेक्ट खेळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: महाविकास आघाडीला भलंमोठं भगदाड; CM शिंदेंनी साधली परफेक्ट खेळी!

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच शिंदे गट मोठी खेळी खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. शिंदे गटाने आपला मोर्चा आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळवला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गटात मोठ्या प्रमाणत सरपंचांनी पक्ष प्रवेश केला होता.

त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि आमदार संतोष बांगर यांनी महाविकास आघाडीला मोठा दणका दिला आहे. परभणी जिल्ह्यातून संतोष बांगर आणि शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या पुढाकाराने परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी पाथरी तालुक्यातील ४० सरपंच आणि परभणी जिल्ह्यातील उपसरपंच, पंचायत समिती सभापती, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे 1593 सरपंच निवडून आले होते. त्यात अजून 124 सरपंचांची भर पडली आहे. शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा विस्तार आणि ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. 

तर प्रवेशा वेळी एकनाथ शिंदे म्हणाले तुम्ही पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू तसेच तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे सर्वांना आश्वस्त केले.