Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना करावी लागली महादेव जानकर यांची मनधरणी, मात्र झालं तरी काय होतं ?

mahadev jankar eknath shinde
mahadev jankar eknath shindesakal

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच धनगर आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात अली होती.   यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांना निमंत्रण न दिल्याने नाराज असल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रकाशित केली होती.

mahadev jankar eknath shinde
Eknath Shinde : ''मराठा आरक्षण आंदोलनावर कुणीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नये'', मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जानकर यांची मनधरणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ‘‘इतर अनेक नेत्यांना बोलावता, मग आमची काय अडचण आहे,’’ अशी खंतही त्यांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. ‘‘तुम्हाला योग्य न्याय मिळेल,’’ असे आश्वासन शिंदे यांनी जानकर यांना दिल्याचे समजते.

धनगर समाजाच्या दृष्टीने आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने, महायुतीचा घटकपक्ष म्हणून आम्हालाही बोलावणे क्रमप्राप्त होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. भाजपवर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही.

- महादेव जानकर, अध्यक्ष, रासप

mahadev jankar eknath shinde
Manoj Jarange यांचा Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना इशारा, अल्टिमेटमवर ठाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com