Why Eknath Shinde is upset about Nashik and Raigad Guardian Minister positionsesakal
महाराष्ट्र बातम्या
Guardian Minister News : एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती
Eknath Shinde : पालकमंत्र्यांच्या या यादीत शिवसेनेचे नेते दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळालेले नसल्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. ते त्यांच्या दरे गावी गेले आहेत.
पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीदाला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. रायगडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले तर नाशिकमधील शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा होती.