हा तर आमच्या बदनामीचा प्रयत्न; 'त्या' पत्रावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून ते पैठण येथे सभा घेणार आहेत
Eknath Shinde visit paithan explanation on the viral letter about the Shinde group
Eknath Shinde visit paithan explanation on the viral letter about the Shinde group esakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार असून ते पैठण येथे सभा घेणार आहेत. या सभेला हजर राहण्यासाठी ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय आदेश देण्यात आले आहेत. या बाबतच पत्रक समोर आले आहे. मात्र, आदेशाचे व्हायरल होणारे पत्र बनावट असून आमच्या बदनामीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.(Eknath Shinde visit paithan explanation on the viral letter about the Shinde group)

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदनीसांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. शासकीय सुट्टी नसताना कामकाज सोडून सभेला येण्याची नोटीस अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना देण्यात आली असल्याचे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, या पत्रसंदर्भात शिंदे गटाने स्पष्टीकरण दिले आहे.

Eknath Shinde visit paithan explanation on the viral letter about the Shinde group
CMच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी कसरत; अंगणवडी सेविकांना हजर राहण्याचे सरकारी आदेश

शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्हायरल होणाऱ्या पत्रकावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र हे पत्रक बनावट आहे. असं पत्र काढून व्हयरल करणे म्हणजे हा निवळ खोडसाळपणा आहे. हा आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचं जंजाळ यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde visit paithan explanation on the viral letter about the Shinde group
बळिराजाला मदत; साडेतीन हजार कोटी प्रशासनाकडे सुपूर्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे सकाळी १० वाजता सभा घेणार आहेत. या सभेला सकाळी १० वाजता हजर रहा, असे आदेश शासनाने काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com