Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'बाळासाहेब' दोन्हीकडे, कोणाची होणार सरशी?

एकीकडे एकनाथ शिंदे गटाची दोन चिन्हे फेटाळण्यात आली असताना येत्या काळात त्यांना नव्यानं चिन्ह देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeraysakal

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह दिलं आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे एकनाथ शिंदे गटाची दोन चिन्हे फेटाळण्यात आली असताना येत्या काळात त्यांना नव्यानं चिन्ह देण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशातच आयोगानं पक्षासाठी वेगळं नाव आणि चिन्हाचे वाटप केले आहे. ज्या आदेशाची शिवसैनिक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो आदेश आयोगानं दिला आहे.

यासगळ्या प्रकरणावर आता शिवसैनिक, शिवसेना नेते,. पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर यांनी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून मोठा धक्का दिला होता. त्यामुळे येत्या काळात पक्षाचे नाव आणि चिन्ह याचे काय होणार असा प्रश्न लाखो शिवसैनिकांना पडला होता.

अखेर आयोगानं पुन्हा एकदा आदेश देत शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे. नव्यानं चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com