Eknath Shinde meets Amit Shah in Delhi during Maharashtra Monsoon Session : राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली पोहोचत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याशिवाय ते नितीन गडकरी यांनाही भेटल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.