
पाली (वार्ताहर) : गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पाऊस कोसळत आहे. अशातच काल रात्रीपासून महाराष्ट्रात पावसाची तुफान एन्ट्री झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हात-तोंडावर आलेले पीक वाहून गेले असल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी झाडे, वीज खांब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रोहा तालुक्यातील संभे गावात मुसळधार पावसामुळे घर कोसळून दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.