खरी शिवसेना नेमकी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयुक्तांचं मोठं विधान; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath SHinde and Uddhav Thackeray

खरी शिवसेना नेमकी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयुक्तांचं मोठं विधान; म्हणाले...

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थगिती नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगांची चर्चा सुरू झाली असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांची प्रतिक्रिया आली आहे.

हेही वाचा: ...तर मोदीही माझं राजकारण संपवू शकणार नाही; पंकजांच्या विधानाचा BJP-NCP कडून बचाव

आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, पारदर्शक प्रक्रियेनेच शिवसेना कोणाची याचा निर्णय होईल. याआधी शिवसेनेकडून निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याचं म्हणत संशय़ व्यक्त केला होता.

वास्तविक बहुमतावरच अनेक निर्णय होत असतात. पक्षात फूट पडली असेल तर पक्षाचा सर्वात मोठा गट कोणाकडे आहे, हे पाहिलं जातं. पक्षाच्या विधीमंडळ गटाचं संख्याबळ आणि मुळ राजकीय पक्षाच्या संख्याबळाचा विचार होता. मात्र स्पष्टता होत नसेल तेव्हा चिन्ह गोठवलं जातं. त्यामुळे ठाकरे-शिंदे वादात संख्याबळ प्राधान्याने पाहिलं जाणार हे निश्चित आहे.

हेही वाचा: Eknath Shinde : निवडणूक आयोगातील लढाई शिंदेच जिंकणार; बाळासाहेबांच्या नातवाला विश्वास

तत्पूर्वी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी निवडणूक आयोगावर शंका घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या की, तूर्तास तरी कोर्टातील युक्तीवादाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जे काही निर्णय होईल, तो पुढील काळात पायंडा ठरू शकतो. निकाल अजून आलेला नाही. तूर्तास तरी आयोगाला निर्णय घेण्यास मोकळं केलं आहे. मात्र निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, त्यामुळे पुढं काय होईल, याचा अंदाज लावणे कठीण राहिलं नाही. मात्र तरी देखील आम्ही आमची बाजू लढू, असंही कायंदे यांनी म्हटलं होतं.