Eknath Shinde : निवडणूक आयोगातील लढाई शिंदेच जिंकणार; बाळासाहेबांच्या नातवाला विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Nihar Thackeray

Eknath Shinde : निवडणूक आयोगातील लढाई शिंदेच जिंकणार; बाळासाहेबांच्या नातवाला विश्वास

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थगिती नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे. यावर आता शिंदे गटाला पाठिंबा देणारे बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आणि दिवंगत शिवसेना प्रमुखांचे नातू निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: EC केंद्राच्या अखत्यारित, त्यामुळे पुढे काय होणार हे स्पष्ट; शिवसेनेची प्रतिक्रिया

निहार ठाकरे म्हणाले की, शिंदे साहेब बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चालले आहेत. त्यामुळे माझा पाठिंबा त्यांनाच आहे. न्यायालयाने सर्वांचं ऐकलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, निवडणूक आयोगाला स्थगिती देण्याची आवश्यकता नाही. निवडणूक आयोगासमोरील लढाई शिंदे गट नक्कीच जिंकणार आहे. आमच्याकडे खासदार आणि आमदारांचा पाठिंबा आहे. यावर विचार करून निवडणूक आयोग निर्णय घेईल, असंही निहार ठाकरे म्हणाले.

आता निवडणूक आयोगच ठरवेल, कोणाला मुदत द्यायची की नाही. आम्ही आधीच दीड लाखहून अधिक प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. शिंदे यांचा गटच खरी शिवसेना आहे. शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालल्याचं निहार ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Cabinet Meeting : फडणवीसांनी शब्द पाळला; शिवभोजन थाळी सुरूच राहणार

दरम्यान निवडणूक आयोग बहुमत बघणार आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी कोणाकडे अधिक आहे हे पाहिलं जाईल. ज्यांच्या गटाकडे बहुमत असतं त्याला मान्यता देण्यात येते. त्यामुळे निवडणूक आयोग आम्हालाच मान्यता देईल, असंही निहार ठाकरे यांनी नमूद केलं.