ShivSena Symbol : कागदपत्रांनी भरलेली कार माघारी गेली; शिंदे गटाचे पुरावे आयोगाने स्वीकारले नाहीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena Symbol

ShivSena Symbol : कागदपत्रांनी भरलेली कार माघारी गेली; शिंदे गटाचे पुरावे आयोगाने स्वीकारले नाहीत?

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणासंदर्भात सुनावणी झाली. आयोगाने आज कुठलाही निर्णय दिलेला नसून १७ जानेवारीला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मात्र, यादरम्यान शिंदे गटाच्या कागदपत्रांची एक गाडी निवडणूक आयोगामध्ये गेली होती. सुनावणीदरम्यान ही कागदपत्र स्वीकारली गेली नसल्याचं सांगितलं जातंय. कारण सुनावणी संपल्यानंतर चार मोठ्या बॅग भरलेली कागदपत्र माघारी पुन्हा गाडीत भरुन नेण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे कागदपत्र स्वीकारले नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 'साम' टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या चार बॅगमध्ये शिवसेना चिन्हावर दावा करणारे पुरावे असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील सगळे बदल हे बेकायदेशीर आहे. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. ही घटना बदलत पक्षप्रमुख हे पद स्वत:साठी उद्धव ठाकरे यांनी तयार केले आणि पक्ष हाती घेतला. हे केल्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. हा बोगसपणा आहे. हा महत्वाचा दावा शिंदे गटाने केला आहे. हा कळीचा मुद्दा शिंदे गटाने निवडणूक आयोगात मांडला आहे.

हेही वाचा: Shiv Sena Symbol Hearing : राऊत 40 मिनिटं थांबले अन् अचानक निघून गेले; सुनावणीदरम्यान झालं काय?

संजय राऊत निघून गेले

दरम्यान, सुनावणीसाठी संजय राऊत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचले होते. तब्बल ४० मिनिटं संजय राऊत आयोगात होते. त्यानंतर ते अचानक निघून गेलं. ४० मिनिटांमध्ये संजय राऊतांना निकालाचा अंदाज आला का? संजय राऊत बाहेर का पडले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. १७ तारखेला पुढची सुनावणी होणार आहे.