esakal | अंतिम नियमावली जारी; मात्र गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक ३१ ऑगस्टनंतरच

बोलून बातमी शोधा

housing society

राज्यातील अडीचशे पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक घेण्याबाबत अखेर अंतिम नियमावली जारी करण्यात आली आहे.

अंतिम नियमावली जारी; मात्र गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक ३१ ऑगस्टनंतरच
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील अडीचशे पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांची निवडणूक घेण्याबाबत अखेर अंतिम नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, आता राज्य सरकारने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकाही ऑगस्टनंतरच होणार आहेत. सहकार विभागाकडून अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी नियमावली जाहीर करण्यात आली. परंतु अंतिम नियमावली प्रसिद्ध न झाल्यामुळे सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अंतिम नियमावली नुकतीच जारी करण्यात आली. परंतु राज्य सरकारने गृहनिर्माण सोसायट्यांसह सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे पुन्हा बहुतांश सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सभासदांचा हिरमोड झाला आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, सोसायट्यांना या कालावधीत मतदार यादी तयार करण्यासह निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करणे शक्य होणार आहे. सोसायट्यांच्या पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना गृहनिर्माण फेडरेशनकडून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्यांना फेडरेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच, गृहनिर्माण फेडरेशनकडून निवडणूक नियमावलीबाबत पुस्तिका तयार करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. 

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

निवडणूक नियमावलीत फारसा बदल करण्यात आलेला नाही. या नियमावलीनुसार सोसायटीचे पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास फेडरेशनला परवानगी देण्यात आली आहे. तसेच, रिझर्व्ह बँकेने सोसायट्यांच्या सोय पुनर्विकासासाठी कर्ज उपलब्धतेचा मार्ग मोकळा केला आहे. 
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ