राज्यपाल पत्राच्या भाषेवरून मुख्यमंत्र्यावर नाराज; मंत्र्यांकडे व्यक्त केली खंत

election of assembly speaker bhagatsingh koshyari unhappy with CM uddhav Thackeray on his language ajit pawar
election of assembly speaker bhagatsingh koshyari unhappy with CM uddhav Thackeray on his language ajit pawar sakal

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी परवानगी द्यावी यासाठी काल महाविकास आघाडीच्या नऊ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळाबाबत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रातील भाषेवरुन राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), छगन भूजबळ (Chagan Bhujbal) आणि नाना पटोलेंनी (Nana Patole) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भाचे निवेदन राज्यपालांना सादर केले. त्यावर आता राज्यपाल सोमवारी निर्णय घेणार असून ते या निवडणुकीला परवानगी देण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

election of assembly speaker bhagatsingh koshyari unhappy with CM uddhav Thackeray on his language ajit pawar
महाविकास आघाडीचे राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी पत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, एकनाथ शिंदे इत्यादी दिग्गज नेत्याने राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा राज्यपालांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.

मागच्या वेळी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक पत्र पाठविले होते. या पत्रात त्यांनी राज्य सरकारने पाठविलेल्या पत्राला संध्याकाळपर्यंत मान्यता द्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान कोश्यारी यांनी, राज्यपाल म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संवाद साधण्याची भाषा योग्य नव्हती, अशी खंत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडे व्यक्त केली. तसेच अभिभाषणाच्या वेळी झालेल्या गोंधळबद्दल देखील त्यांनी सूनावले.

election of assembly speaker bhagatsingh koshyari unhappy with CM uddhav Thackeray on his language ajit pawar
Russia Ukraine War Live : युक्रेनच्या मारियुपोल शहराची रशियन सैन्याकडून नाकेबंदी

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विनंती सोबतच काही मुद्द्यांवर ठणकावलं देखील होते. विधिमंडळातील कायदे घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही. निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. यात आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच येत नाही, असे म्हणतं सरकारने केलेल्या कायद्याबाबत अविश्वास दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

election of assembly speaker bhagatsingh koshyari unhappy with CM uddhav Thackeray on his language ajit pawar
मार्च आलाय; कर नियोजन केलं की नाही? जाणून घ्या Tax वाचवण्याच्या टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com