APMC Election : बाजार समित्यांचे बिगूल वाजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election on 29 January of 281 Agricultural Produce Market Committees mumbai

APMC Election : बाजार समित्यांचे बिगूल वाजले

मुंबई : राज्यातील २८१ कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जाहीर झाला आहे. ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुका पुढील वर्षी २९ जानेवारी रोजी होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक प्रक्रिया बुधवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याचे माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

बाजार समितींच्या निवडणुकीसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले हेत. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यानुसार उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया निश्‍चित कालावधीत पूर्ण करण्याची आदेश दिला होता. त्यानुसार या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

संभाव्य निवडणू‍क कार्यक्रम

  • निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक जाहीर करणे : २३ डिसेंबर

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी : २३ ते २९ डिसेंबर

  • उमेदवारी मागे घेणे : २ ते १६ जानेवारी २०२२

  • उमेदवारांची अंतिम यादी : १७ जानेवारी

  • मतदान : २९ जानेवारी

  • निकाल जाहीर : ३० जानेवारी