निवडणूक कार्यक्रम जाहीर! सोलापूर बार असोसिएशनसाठी 4 ऑगस्टला मतदान; वकिलांना अर्ज घ्यायला अन्‌ भरायला 2 दिवसांची मुदत, ‘हे’ आहेत निवडणुकीसाठी इच्छुक

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज करणाऱ्या वकील सभासदांना वर्गणी भरायला २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर होऊन २३ जुलैला यादी अंतिम होईल. त्यानंतर अर्ज घेणे, दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. ४ ऑगस्टला मतदान होऊन ५ ऑगस्टला नवे पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.
advocate
advocatesolapur
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज करणाऱ्या वकील सभासदांना वर्गणी भरायला २० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर होऊन २३ जुलैला यादी अंतिम होईल. त्यानंतर अर्ज घेणे, दाखल करण्याची कार्यवाही होणार आहे. ४ ऑगस्टला मतदान होऊन ५ ऑगस्टला नवे पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.

सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा ४ जुलै रोजी कार्यकाळ पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) असोसिएशनची सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, माजी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण मारडकर, ॲड. एच. एम. अंकलगी, ॲड. उमेश मराठे, ॲड. संजीव सदाफुले, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. अशोक जालादी आदी उपस्थित होते. यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकीसाठी यंदा ॲड. संतोष पाटील, ॲड. विक्रांत फताटे, ॲड. राजेंद्र फताटे हे अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी ॲड. विनोदकुमार जमादार, ॲड. परमानंद जवळकोटे, सचिव पदासाठी ॲड. मंजुनाथ कक्कळमेली, ॲड. जयप्रकाश भंडारे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय अन्य वकिलांचीही चाचपणी सुरू आहे.

निवडणूक कार्यक्रम असा...

  • सभासद वर्गणी भरणे : २० जुलैपर्यंत

  • प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २१ जुलै

  • मतदार यादीवर हरकती : २१ व २२ जुलै

  • अंतिम मतदार यादी : २३ जुलै

  • अर्ज विक्री-स्वीकृती : २४ व २७ जुलै

  • उमेदवारी अर्जांची छाननी व पात्र यादी : २८ जुलै

  • उमेदवारी अर्ज माघार व अंतिम यादी : २९ जुलै

  • मतदान व मतमोजणी : ४ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The announcement brings major relief to Maratha and Kunbi students awaiting financial assistance for higher education.
solapur
Engineering Admission
advocate
Marathi News Esakal
www.esakal.com