Andheri by-Election: पोटनिवडणूक शिंदे गट नाही तर भाजप लढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri by-Election

Andheri by-Election: पोटनिवडणूक शिंदे गट नाही तर भाजप लढणार

अंधेरी मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक भाजपच लढणार असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे राखीव निवडणूक चिन्ह नसल्याने होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीला एकनाथ शिंदे यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणूकीत भाजपच उतरणार आहे. (Election Symbol With Shinde Group By Election Of Andheri East Assembly Seat Going To Contest By Bjp Print Politics News )

शिवसेनेतल्या अभुतपूर्व फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मात करण्यासाठी भाजपने कंबर कसायला सुरूवात केली आहे.

१२ मे रोजी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही जागा शिवसेनेकडे होती. यामुळे शिंदे गटाकडून यावर दावा करण्यात येत होता. आमदार लटके यांचे मुख्यमंत्री शिंदेंशी निकटचे संबंध होते. लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

दरम्यान, ही जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाने आणि भाजप लढल्यास उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळाकडून घेतला जाईल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच उपलब्ध नाही. खरी शिवसेना कोण, या संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या पोटनिवडणुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीआधी निर्णय होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आता ही जागा भाजपनेच लढवावी, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा मानस आहे.