राज्यात विजेच्या मागणीत वाढ; काय आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

गणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे.

मुंबई - अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे दोन हजार मेगावॉटची वाढ झाल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सवात विजेची मागणी १४ ते १६ हजार मेगावॉटदरम्यान होती. विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक आठ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाचमधून वीज उत्पादन सुरू झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे; मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना राऊत यांनी दिले आहेत.

प्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात ते जाणून घ्याच

केंद्र सरकारने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity demand increase in maharashtra state