वीजेचा लपंडाव, सोलापूर शहराला आता ४ दिवसाआड पाणी! औज बंधारा कोरडा, पाकणीचे जलशुद्धीकरण केंद्र बंद, सोरेगावचा पंप जळाला, वाचा...

लाईट सतत ये-जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोरेगाव पंपहाऊसवरील पंप जळाला. तेथील दुसरा पंप जोडून पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा तीनऐवजी पुन्हा चार दिवसाआड केला जाणार आहे.
Solapur city

Solapur city

Canva
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : तापमानाचा पारा ४२ अंशावर गेल्याने वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वीजपुरवठा सतत खंडीत होऊ लागला आहे. लाईट सतत ये-जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोरेगाव पंपहाऊसवरील पंप जळाला. तेथील दुसरा पंप जोडून पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा तीनऐवजी पुन्हा चार दिवसाआड केला जाणार आहे.

सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडलेले आहे. तरीपण, उन्हाच्या तडाख्यामुळे शेती पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप सुरु करुन पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे शेती फिडरवरील लाईट सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत (लोड शेडिंग) बंद ठेवली जात आहे. या वेळेत अनेक गावे अंधारात आहेत. आता सोलापूर शहरातील अनेक नगरांचा वीजपुरवठा देखील सतत बंद- चालू होत आहे.

वीजेचा लंपडाव सुरु असल्याने दोन दिवसांत दोनवेळा पाकणी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. त्यामुळे उजनीतून होणारा पाणी उपसा देखील बंद करावा लागला. जुळे सोलापूरमधील ‘एमबीआर’वरही विद्युतपुरवठ्याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे औज बंधाराही कोरडा पडला आहे. त्यामुळे नियोजनानुसार सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर गावठाण भागाचा पाणीपुरवठा पुन्हा चार दिवसाआड केला जाणार असल्याचे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

औज बंधाराही कोरडा, पाणी उपसा बंद

सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. मात्र, सध्या बंधाऱ्याने तळ गाठला असून बंधाऱ्यातून पाणी उपसा बंद पडला आहे. त्यामुळे देखील शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी कधी सोडले जाईल, याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com