नोकरी देता का नोकरी? पुणे, ठाणे, सोलापुरमध्ये ‘ऐवढ्या’ जणांनी कोली नोंदणी; महास्वयंमकडूनही मिळेना प्रतिसाद

Employment opportunities in Maharashtra after registration on Mahasvayam
Employment opportunities in Maharashtra after registration on Mahasvayam

सोलापूर : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी १७ लाख ८८ हजार ८८९ बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. लॉकडाऊनमुळे मजूरांचे स्थलांतर झाले. तर काही ठिकाणी कामगार कपात झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सरकारने रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ‘म्हास्वयंम’ पोर्टल सुरु केले मात्र, त्यावरुनही प्रतिसातद मिळत नसल्याचे ‘सकाळ’च्या पहाणीत आले आहे.
लॉकडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या कामगारांमुळे उद्योगांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी व गरजूंना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महास्वयंम’ वेबपोर्टल सुरु केले आहे. यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या जिल्ह्यात काम मिळावे यासाठी अर्ज करता येत आहे. शिक्षण आणि आवडीनुसार हव्या त्या जिल्ह्यात यामुळे नोंदणी करता येत आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अडीच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळे अनेक कामगार आपापल्या गावी गेले आहेत. तर काही ठिकाणी उद्योग धंद्यांवर परिणाम झाल्याने कामगार कपात केले आहेत. त्यामुळे रोजगारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वी सरकारने रोजगार देणारे आणि रोजगार मागणारे यांच्यासाठी कॉमन 
प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. राज्यातील विविध उद्योग क्षेत्रामधील कामगार स्थलांतरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बळकटी देण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून रिक्त पदे, उमेदवारांची यादी, नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांना निःशुल्क कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जात आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राने यासाठी पुढाकार घेतला आहे. या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यात १७ लाख ८८ हजार ८८९ जणांनी रोजगार मिळावा यासाठी नोंदणी केली आहे. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधल्यानंतर प्रतिसादही दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकाच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यांना नोकरी मिळावी म्हणून https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना नोंदणी करावी असे आवाहन आहे. त्यासाठी आधार क्रमांक आवश्‍यक आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून नोंदणी करता येत आहे. कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे. कोणत्या जिल्ह्यात नोकरी करायची आहे व शिक्षण असे विभाग दिले आहेत. मात्र हे संकेतस्थळावर काही अडचणी येत आहेत.

प्रजक्ता वडतिले म्हणाल्या, राज्य सरकारने 'महास्वयंम वेबपोर्टल' सुरू केलं. त्यावर रोजगाराच्या संधी, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन, लोन देण्याची सुविधा या गोष्टी दिसत आहेत. परंतु नोकरीबद्दल कुठेच काही दिसत नाही. साईटपण व्यवस्थित ओपन होत नाही. रजिस्ट्रेशन करताना सुरवातीला आधार कार्ड नोंदणी केली, त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होतं नाही. करोनामध्ये सरकार रोजगार मिळवून देण्याचं सांगत आहे पण इथं तर साधी नोंदणीसुध्दा व्यवस्थित होताना दिसत नाही. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आव्हानानुसार संकेत स्थळावर नोकरीच्या शोधात असणारे नोंदणी करत आहेत. मात्र, याबाबत अडचणी येत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
संकेतस्थळावर 022-22625651/५३ हा क्रमांक दिला आहे. मात्र, त्यावर संपर्क होत नाही. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ‘महास्वयंम’बाबत तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक संपर्क क्रमांक दिला आहे. त्यावरुन पुन्हा एखदा प्रयत्न करा, असा सल्ला देण्यात आला.

नागरी सुविधा केंद्रातूनही होईना संपर्क
संकेतस्थळावरील क्रमांक लागत नसल्याने ‘सकाळ’ने नागरी सुविधा केंद्रावर संपर्क साधला त्यानंतर त्यांनी कॉल जोडून देण्याचा प्रयत्न केला. मात्र. तेव्हाही संपर्क झाला नाही. त्यानंतर नागरी सुविधा केंद्रातून आमचं काम फक्त कॉल जोडून देणे असल्याचे म्हणत पुन्हा कॉल करण्यास सांगण्यात आले. 

या जिल्ह्यात ऐवढ्या जणांनी केली नोंदणी (स्त्रोत महास्वयंम संकेतस्थळ) 
पुणे : १५४०९१, ठाणे : १४६३०, नाशिक : ९८५४०, नागपूर : ९१५८१, औरंगाबाद : ९०१७४, अहमदनगर : ७९२४५, कोल्हापूर : ७८९२५, बीड : ७४३१७, जळगाव : ६९५२४, सोलापूर : ६३६२०, लातूर : ७८३७६, सांगली : ५८२१३, सिंधुदूर्ग : १२८६५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com