esakal | युवकांसाठी रोजगार योजना
sakal

बोलून बातमी शोधा

youth

बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता रोजगार देणारी महत्त्वाकांक्षी योजना होणाऱ्या महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात  जाहीर होण्याची शक्यता आहे.

युवकांसाठी रोजगार योजना

sakal_logo
By
संजय मिस्कीन

बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता रोजगार देणारी महत्त्वाकांक्षी योजना होणाऱ्या महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात  जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत सहा लाख युवकांना रोजगार देणारी योजना अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता.६) अर्थसंकल्पातून जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यभरातील तालुका व जिल्हा स्तरावर बेरोजगार युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण व रोजगाराची संधी निर्माण करून देणारी ही योजना असेल. यासाठी प्रत्येक युवकाला दरमहा सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. या विद्या वेतनातून युवकाने कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्याला रोजगारासाठी सक्षम करणे हा या योजनेचा मूळ हेतू आहे. 

अशी आहे योजना
यंदा दोन लाख बेरोजगारांना संधी 
सुरुवातीला कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार
दरमहा नऊ हजाराचा खर्च
सरकारकडून सहा हजार रुपये दरमहा मिळणार तर तीन हजार रुपये युवकाने खर्च करणे अपेक्षित

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या तिन्ही राजकीय पक्षाने बेरोजगारी वरून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले होते. नोटबंदी आणि जागतिक मंदी त्यातच जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील रोजगाराचे प्रमाण खालवले होते. या पार्श्‍वभूमीवर बेरोजगार युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात राज्यावरील वाढते कर्ज, घटणारी  गुंतवणूक आणि विविध विकास प्रकल्पांसाठीचा अपुरा निधी यावर विशेष योजना जाहीर होतील असे मानले जाते. 

‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ ‘लिम्का बुक’मध्ये