‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ ‘लिम्का बुक’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींमधील कल्पनाशक्तीचा अधिकाधिक विकास व्हावा, अशा पद्धतीने स्पर्धेची रचना बदलत आणली आहे. कॉलेजमधील स्पर्धा ‘पेपरलेस’ बनवली आणि ऑनलाइन आणली. साचेबद्ध विषय न देता स्पर्धकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विषय निवडले. कॉलेजमध्ये तैलरंगांमध्येही स्पर्धा घेतली. या साऱ्यांचा परिणाम म्हणून स्पर्धेला प्रतिसाद वाढतो आहे. ‘सकाळ’ची राज्यभरातील विशालकाय यंत्रणा स्पर्धेसाठी अहोरात्र काम करते. महाराष्ट्राच्या उगवत्या पिढीत कलासंस्कार रुजविण्याचा प्रयत्न ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’च्या माध्यमातून आम्ही करतो आहोत.
- मृणाल पवार, संचालक, सकाळ माध्यम समूह

पुणे - चित्रांच्या दुनियेतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धेची’ नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत तब्बल ७ लाख ६३ हजार २६४ विद्यार्थी एकाच दिवशी, एकाच वेळी १२ शहरांतून सहभागी झाल्याचा आता देशात विक्रम झाला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘सकाळ माध्यम समूहा’कडून गेली ३४ वर्षे डिसेंबरमध्ये ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ दरवर्षी घेतली जाते. पहिली ते दहावीपर्यंतचे लाखो विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतात. रंगरेषांच्या माध्यमातून आपल्या मनातील भाव चित्रांमध्ये उतरवून हे विद्यार्थी आसमंतात रंग भरतात. महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याशी अतूट नाते असलेल्या या स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे. म्हणूनच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ने या स्पर्धेची देशात विक्रम म्हणून नोंद केली आहे.

कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

जागतिक विक्रम म्हणून स्थान मिळविलेली ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १६ डिसेंबर २०१८ रोजी पुणे, सातारा, नगर, नांदेड, मुंबई, नागपूर, अकोला, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि गोव्यात झाली होती. दोन हजार केंद्रांवरून ७ लाख ६३ हजार २६४ विद्यार्थी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांदरम्यान झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेची पाहणी ‘लिम्का बुक’च्या अधिकाऱ्यांनी त्या वेळी केली.

Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार, आता 'ही' तारीख!

बारकाईने आणि काटेकोर तपासणी करून या विक्रमाची नोंद देशातील विक्रम म्हणून केल्याचे ‘लिम्का बुक’चे संपादक वत्सल कौल बॅनर्जी यांनी ‘सकाळ’ला नुकतेच प्रमाणपत्रासह कळविले. ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेची यापूर्वी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्येही नोंद झाली आहे.

'मी ब्राह्मण नसूनही मला...'; तेजश्री प्रधान म्हणते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal drawing competition in limca book of records