esakal | राज्यात ऐन सणासुदीच्या काळात लोडशेडींग राहणार? ऊर्जामंत्र्यांनी दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

राज्यात ऐन सणासुदीच्या काळात लोडशेडींग राहणार? ऊर्जामंत्र्यांनी दिलं उत्तर

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : राज्यात सध्या कोळसा पुरवठा (coal supply) हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भुसावळ येथील एक संच सुरू करण्यात आला आहे. सध्या भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि नाशिक येथील संच बंद आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी ३ संच बंद आहे. एकूण राज्यातील २७ पैकी ७ संच बंद आहेत, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (energy minister nitin raut) म्हणाले. यावेळी लोडशेडींगबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं.

हेही वाचा: मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे : फडणवीस

कोल इंडियाची कोळसा वाहून नेण्याची क्षमता ४० लाख मेट्रीक टन आहे. मात्र, पावसामुळे ही क्षमता २२ लाख मेट्रीकपर्यंत खाली आली आहे. सध्याच्या स्थितीत ही क्षमता २७ लाखांवर पोहोचली. राज्याला क्षमतेनुसार कोळसा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. पण, अपेक्षित दर्जाचा कोळसा मिळत नाही. गॅसवर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी गॅस मिळत नाही. महाराष्ट्राला फक्त ३० टक्के गॅसचा पुरवठा केला जात आहे. महावितरणने जीएसडब्लूसोबत करार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून वीजपुरवठा केला जात नाही, असा आरोप नितीन राऊत यांनी केंद्रावर केला.

कोल इंडिया लिमिटेडच्या ढिसाळ कारभारामुळे कोळशाची टंचाई जाणवत आहे. कोल इंडियाला कोळशाचा साठा निर्माण करता आला नाही. आंतरराष्ट्रीय बारातून खासगी वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी थांबवला आहे. ही स्थिती परिस्थिती उद्भवणार होती याची कल्पना होती. पण, प्रत्यक्षात पाऊस आला. वीजचे मागणी वाढली. कोळशाच्या साठ्यावर परिणाम झाला. राज्याला ठरल्याप्रमाणे कोळसा पुरविण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा केंद्रामध्ये कोळसा पुरविण्याची मागणी केली आहे, असेही नितीन राऊत म्हणाले.

राज्यात लोडशेडींग असेल का? -

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी २५० कोटींचा खर्च केला. राज्यात सध्या वीजेची मागणी ही 17500 ते 18000 मेगावॅट असली तरी ती 21 हजारपेक्षा जास्त वाढू शकते. त्यासाठी जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नो लोडशेडींग हा आमचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचा ऊर्जामंत्री म्हणून राज्यात कुठलेही लोडशेडींग असणार नाही, अशी ग्वाही देतो. मात्र, सणासुदीच्या काळात काटकसर करणे गरजेचे आहे. सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 जास्त वीज वापरली जाते. या वेळेत काटकसर करण्याचं आवाहन देखील नितीन राऊतांनी केलं.

loading image
go to top