esakal | मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे, फडणवीसांचं नवी मुंबईत वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

मला वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे : फडणवीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर (Navi mumbai belapur) येथे मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते फडणवीसांनी 'मला एकही दिवस जाणवलं नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे.', असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात या, मग कळेल; फडणवीस, पाटलांना गृहराज्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर

तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही. तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक देखील केली. म्हात्रे यांनी कोविड काळात अत्यंत चांगले काम केले आहे. तसेच त्या नेहमी गोरगरीबांच्या कामासाठी तत्पर असतात, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपसोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. पण, निवडणुकीच्या आधी सुद्धा आणि नंतरही देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन-मी पुन्हा येईन' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका देखील झाली होती.

loading image
go to top