स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत मेट वस्तीवर पाणी!

पर्यावरण मंत्र्यांचा आदिवासी महिलांना दिलासा
Environment Minister water relief tribal women Aaditya Thackeray nashik
Environment Minister water relief tribal women Aaditya Thackeray nashiksakal

हरसूल : काही दिवसांपूर्वी महादरवाजा मेट येथील महिला विहिरीमध्ये उतरून पाणी काढत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दाखवली. त्याची दखल घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. त्यानुसार महादरवाजा मेटला भेट देऊन लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याचे वचन तेथील ग्रामस्थांना शिवसैनिकांनी दिले.

थ्री फेज, भारनियमन अशा समस्यांवर मात करत ग्रामस्थ व प्रशासनाच्या मदतीने आठ दिवसांच्या मेहनतीला अखेर यश आले. महादरवाजा मेट येथील लोकांना दिलेले वचन पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू केला, जोपर्यंत महादरवाजा मेट येथे पाणी येत नाही, तोपर्यंत तालुकाप्रमुख संपत चव्हाण, कल्पेश कदम, सागर पन्हाळे, विष्णू महाले, गौरव वाघ, विलास कोरडे, संपत चहाले यांनी जिल्हा परिषद अभियंते सूर्यवंशी यांच्यासोबत मोहीम आखली.

मेटघर किल्ला अंतर्गत येणाऱ्या गँगाद्वार सुपलीची मेट, जांभाची वाडी, पठारवाडी, पत्र्याचा पाडा आणि महादरवाजा मेट येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शासनाकडून मंजुरी मिळेल व या सहा वाड्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल. यापुढेही मेटघर किल्ला अंतर्गत येणाऱ्या सहा वाड्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे शिवसैनिक कल्पेश कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com