

trusted Marathi news platform
sakal
Marathi News Platform: मराठी डिजिटल न्यूजमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत eSakal.com ने Comscore च्या ताज्या अहवालात पहिला क्रमांक मिळवला आहे. तब्बल 61.1 मिलियन युनिक युजर्ससह eSakal.com ने आपली आघाडी कायम राखत मराठी वाचकांच्या विश्वासाचा मान पुन्हा मिळवला आहे. छापील परंपरेपासून ते डिजिटल नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास केवळ माध्यम बदलाचा नाही, तर मराठी पत्रकारितेच्या उत्क्रांतीचा एक प्रेरणादायी टप्पा आहे.