वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

सोमवारी (ता. १३) लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार मंडलाधिकाऱ्याच्या कार्यालयात पोचले, पण ते घरी गेल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधून तक्रारदार मंडलाधिकाऱ्याच्या घराकडे गेला. पैसे घेऊन आलोय, चौकातील एका ठिकाणी बोलावले. मात्र, मंडलाधिकाऱ्यास संशय आल्याने त्याने घरी ये नाहीतर, परत बघू म्हणून सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला लाचेच्या मागणीवरून अटक केली.
anti corruption buro, solapur

anti corruption buro, solapur

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शेतातील विहीर खोदकामातून निघालेल्या मुरूमाची वाहतूक व वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून तक्रारदाराने उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज केला होता. अर्जानुसार स्थळ पाहणी करून तहसीलदारांना सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी मंडलाधिकाऱ्याने तक्रारदाराकडे एक लाखाची लाच मागितली. त्याअनुषंगाने पडताळणीअंती सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडलाधिकाऱ्यास अटक केली. त्याच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार माने (वय ५४) असे त्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराचा मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे. बेलाटी येथील एका विहिरीचे काम सुरू असून त्याठिकाणचा मुरूम वाहतूक करण्यासाठी तहसीलदारांकडून परवानगी मिळावी म्हणून तक्रारदाराने अर्ज केला होता. काही दिवसांनी तो अर्ज तहसील कार्यालयातून तिऱ्हे येथील मंडलाधिकारी विजयकुमार माने याच्याकडे स्थळ पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता.

अर्जाच्या अनुषंगाने मंडलाधिकाऱ्याने मुरुमाच्या ठिकाणची पाहणी करून (स्थळ पाहणी) त्याचा अहवाल तहसीलदारांना पाठविणे अपेक्षित होते. मात्र, काही दिवसांचा विलंब करून मंडलाधिकाऱ्याने स्थळ पाहणी केली. त्यानंतर त्याने तक्रारदाराला बोलावून घेतले आणि सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी शासनाच्या रॉयल्टीशिवाय एक लाखाची लाच मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीबद्दल खात्री केली, त्यांच्यातील संभाषणाची पडताळणी केली. त्यानुसार मंडलाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो अटकेत आहे. त्याला उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पैसे घेऊन घरी येण्याचा आग्रह अन्‌...

सोमवारी (ता. १३) लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार मंडलाधिकाऱ्याच्या कार्यालयात पोचले, पण ते घरी गेल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधून तक्रारदार मंडलाधिकाऱ्याच्या घराकडे गेला. पैसे घेऊन आलोय, चौकातील एका ठिकाणी बोलावले. मात्र, मंडलाधिकाऱ्यास संशय आल्याने त्याने घरी ये नाहीतर, परत बघू म्हणून सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला लाचेच्या मागणीवरून अटक केली. ही कामगिरी पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र लांभाते, सहायक पोलिस उपनिरीक्षक कोळी, अंमलदार संतोष नरोटे, शिरीषकुमार सोनवणे, स्वामीराव जाधव, श्रीराम घुगे, सलीम मुल्ला, गजानन किणगी, रवी हाटखिळे, राजू पवार, अक्षय श्रीराम, अनुप दळवी यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com