Dipali Sayyad Latest Marathi News
Dipali Sayyad Latest Marathi News

'त्या' गाडीत मोदी असते तरीही ती फोडली असती - दिपाली सय्यद

राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांच्या कारवर दगडफेक झाली होती.

मुंबई : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली होती. या घटनेचं समर्थन शिवसेनेच्या पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केलं आहे. समर्थन करताना त्यांनी एक वादग्रस्त विधानही केलं. जर या कारमध्ये सोमय्यांऐवजी पंतप्रधान मोदी जरी असते तरी ती कार शिवसैनिकांनी फोडली असती असं त्यांनी म्हटलं आहे. रायगड इथं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. (Even if PM Modi was in that car instead of Kirit Somaiya it would have exploded says Deepali Syyed)

Dipali Sayyad Latest Marathi News
FIR वर सही नव्हती, खार पोलिसांनीदेखील केलं मान्य : सोमय्या

दिपाली सय्यद म्हणाल्या, "त्यावेळची परिस्थितीच तशी होती. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. जो नडला त्याला फोडला हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. त्या ठिकाणी जर मोदीजींची देखील गाडी असली असती तर तीही फोडली गेली असती" विरोधकांच्या आरोपांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या संकल्प सभा सुरु आहेत, या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांना उत्तर दिली आहेत. हे चुकीचं सुरु असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय. पण आता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महासभा घेत विरोधकांना उत्तर द्यावं, तेव्हाच या सर्व गोष्टी थांबतील" (Dipali Sayyad Latest Marathi News)

Dipali Sayyad Latest Marathi News
राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादेत मनसेला धक्का,दाशरथे भाजपमध्ये करणार प्रवेश

दोन-तीन दिवसांपासून जे सुरु आहे. राणा कुटुंबीय आहेत हे मोदीजींचे माकडं आहेत असं मी आधीच म्हटलंय. हे लोक अचानक येतात आणि अचानक बोलतात. त्यांची विधानंही चुकीची आहेत की आम्ही मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा म्हणणार, हे चुकीचं होतं. तुम्हाला करायला मनाई नव्हती. तुम्ही प्रेमानं या तुम्ही मंदिरांमध्ये येऊन हे करा. हा विचित्र खेळ सुरु असल्याचं दिसतंय. राष्ट्रपती राजवट लावायची किंवा आमचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी हा सर्व उद्योग सुरु आहे, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com