राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादेत मनसेला धक्का,दाशरथे भाजपमध्ये करणार प्रवेश

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादेत मनसेला धक्का
Raj Thackeray And Suhas Dashrathe
Raj Thackeray And Suhas Dashratheesakal

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादेत सभा होत आहे. त्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आज मंगळवारी (ता.२६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यात सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांची जिल्हाध्यक्षपदावरुन हाकलपट्टी करण्यात आली होती. (Suhas Dashrathe Will Join BJP Before MNS Chief Raj Thackeray Public Gathering In Aurangabad)

Raj Thackeray And Suhas Dashrathe
राज ठाकरे भाषणात भाजपाचे बोल बोलतात; रोहित पवारांचा घणाघात

सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून नेमके आपले काय चुकले हे सांगावे, अशी विनंती दाशरथे यांनी केली होती. मात्र त्याला मनसेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पक्षातील त्यांचे चार समर्थक पदाधिकाऱ्यांचीही हाकलपट्टी करण्यात आली होती.

Raj Thackeray And Suhas Dashrathe
पोलिसांनीच शिवसैनिकांना परवानगी दिली, देवेंद्र फडणवीस भडकले

औरंगाबादेत येत्या रविवारी म्हणजे १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. अद्यापही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिलेली नाही. मात्र पक्षाचे पदाधिकारी नागरिकांना सभेला येण्याचे निमंत्रण देत आहेत. दुसरीकडे मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. आज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत दाशरथे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला किती फायदा होणार याचे उत्तर मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com