पुणे - ‘लोकमान्य टिळक यांचे स्वप्नं ‘स्वराज्य’ होते. त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले. त्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करायचे आहे. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनातून पूर्णपणे अपेक्षित असणारे सुराज्य करण्यासाठी, भारताला विश्वगुरू म्हणून जगात क्रमांक एकची महाशक्ती बनविण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या.