esakal | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा पुन्हा छापा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नागपुर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. कारण, आज सकाळी ईडीने त्यांच्या काटोलच्या घरी छापा टाकला आहे. ईडीकडून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली जात आहे. आज सकाळी ईडीचे चार अधिकारी नागपूरमध्ये आले होते. त्यांनी काटोल तालुक्यात जाऊन अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली. ईडीचे अधिकारी तपास करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ईडी अनिल देशमुख यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. (ex home minister ncp leader anil deshmukh ed raid on nagpur katol house)

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने त्यांच्या नागपुरमधील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने त्यांच्या काटोलमधील घरावर कारवाई केली आहे. ईडीने याआधी तीनवेळा अनिल देशमुख यांना समन्स पाठवला होता. पण, ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने आक्रमक पवित्रा घेतलाय. अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकलाय. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर असल्याचं सांगितलं जातंय. अनिल देशमुख सध्या कुठे आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही. ते मुंबईत असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: बळजबरी धर्मांतर प्रकरणाचे नागपूर कनेक्शन, UP ATS कडून तिघांना अटक

ईडीने आतापर्यंत अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केलीये. यासंदर्भातील माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले होते. तसेच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले. या जप्त संपत्तीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती समाविष्ट आहे. ईडीने बजावलेल्या समन्समध्ये त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई समोर आली आहे. गैरव्यवहार आणि भष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता आहे. या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये वरळीमधील 1.54 कोटींचा फ्लॅट आणि रायगड जिल्ह्यातील उरणमधील धुतुम गावात 2.67 कोटी रुपयांची संपत्ती यांचा समावेश आहे.

loading image