esakal | बळजबरी धर्मांतर प्रकरणाचे नागपूर कनेक्शन, उत्तर प्रदेश ATS कडून तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

बळजबरी धर्मांतर प्रकरणाचे नागपूर कनेक्शन, UP ATS कडून तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी (UP ATS) पथकाने नागपुरातील गणेशपेठ परिसरात (ganeshpeth nagpur) छापा टाकून तीन जणांना अटक केली. प्रसाद रामेश्वर कांबळे, कौसर आलम शोकत अली खाना व भूप्रियबंडो देविदास मानकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (UP ats arrested three people from nagpur)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद हा गणेशपेठेतील राहुल कॉप्लेक्समध्ये राहतो. तर कौसर आलम हा झारखंडमधील धनबादमधील लोहिचारा येथील रहिवासी आहे. मानकर हा गडचिरोलीतील चामोर्शीतील वायगाव येथे राहतो. एक महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर करणारे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणात गोमतीनगर पोलिस स्टेशनमध्ये धर्मांतरविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. एटीएसने यावेळी अटकेतील आरोपींकडून एक डायरीही जप्त केली होती. यात महाराष्ट्र केरळ, हरियाणा, आंध्रप्रदेश व दिल्लीतील रॅकेटच्या सदस्यांची नावे होती. तेही या कटात सहभागी झाल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते. कांबळे हा दोन साथीदारांसह नागपुरातील घरी दडून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. शुक्रवारी मध्यरात्री एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राहुल कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक २०२ मध्ये छापा टाकला.एटीएसच्या पथकाने प्रसाद, कौसर व मानकरला अटक केली. मध्यरात्रीच एटीएसचे पथक तिघांना घेऊन लखनौकडे रवाना झाले.

loading image