माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आणखी तीन दिवस कोठडीत मुक्काम वाढला I Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आणखी तीन दिवस कोठडीत मुक्काम वाढला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सुनावण्यात आलेली कोठडी आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयानं देशमुखांना तीन दिवसांची ईडी कोठडी म्हणजेच, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या मुंबई सेशन्स कोर्टात (Mumbai Sessions Court) जाणार असल्याचे समजतेय. ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची आणखी तीन दिवस ईडी कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यावर आज पुन्हा अनिल देशमुख न्यायालयात हजर होते.

हेही वाचा: 'जय श्रीराम' म्हणणारे संत नसून 'राक्षस'? काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 6 तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर, त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. दरम्यान, कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावलीय.

loading image
go to top