Winter Session 2022 : माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना श्वसनाचा त्रास; विधानभवनातून खासगी रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Session 2022

Winter Session 2022 : माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना श्वसनाचा त्रास; विधानभवनातून खासगी रुग्णालयात दाखल

नागपूरः राज्याचे माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांना आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने विधानभवनात अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे.

भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी विधान भवनात त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. सहकाऱ्यांसह परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते गेले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचाः सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

दरम्यान ,बनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या द्वारातून आत येत असताना एक गटाराच्या चेंबरमध्ये मागचे चाक फलसे. लोकांनी धक्का मारून रुग्णवाहिका बाहेर काढली.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असून तब्बल ३० आमदारांनी अस्वस्थ वाटू लागल्याने तपासण्या करुन घेतल्या आहेत.

टॅग्स :Bjpwinter session